Dehu Nagar Panchayat : देहू नगरपंचायतीत या दोन नामनिर्देशित सदस्यांची निवड..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
देहूगाव – देहू नगरपंचायतीतील रिक्त असलेल्या दोन नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदांवर अमोल काळोखे आणि योगेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा पिठासीन अधिकारी हवेली उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी शुक्रवारी (दि. १०) केली.देहू नगरपंचायतीत एक स्वीकृत सदस्य पद पूर्वीपासूनच रिक्त होते, तर नगरसेवक अमित टिळेकर यांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक जागा रिक्त झाली होती. या दोन पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्याकडे शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. या काळात दोन अर्ज सादर झाले. त्यानंतर दुपारी एक वाजता पिठासीन अधिकारी माने यांनी नामनिर्देशन अर्जांची छाननी केली असता दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यामुळे दोन्ही रिक्त स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अमोल काळोखे आणि योगेश मोरे यांची अधिकृतपणे निवड घोषित करण्यात आली.





