WPL 2024 : दीप्ती शर्माने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू….

Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या एका रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावाने पराभव केला. दीप्ती शर्माला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले, जिने 59 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 138 पर्यंत नेली. यानंतर त्याने 4 विकेट्सही घेतल्या, ज्या दरम्यान तिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
या सामन्यात दीप्ती शर्माला दिल्लीविरुद्ध वर पाठवले होते, ती तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. येथेही यूपीचे इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत, पण दुसऱ्या टोकाला दीप्ती शर्माने एक बाजू लावून धरली. तिने 48 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या.
दीप्तीने गोलंदाजीतही आश्चर्यकारक कामगिरी केली, ती डब्लूपीएल WPL मध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. तिने 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅग लॅनिंगला बाद केले. यानंतर दीप्तीने 19 वे षटक टाकले, त्यातील पहिल्या दोन चेंडूंवर तिने अनुक्रमे सदरलँड आणि अरुंधती रेड्डी यांना बाद करून हॅट्ट्रिक साधली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2023-24-final-anjikya-rahane-and-shreyas-iyer-who-are-trying-to-make-a-comeback-in-team-india-flop-again/
अशाप्रकारे दीप्ती शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि हॅट्ट्रिक करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी कोणत्याही महिला क्रिकेटरला अशी कामगिरी करता आली नव्हती.





