ICC Women’s ODI Rankings : दीप्ती शर्माने गाठली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग…

ICC Women’s ODI Rankings : भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्मा मंगळवारी आयसीसीच्या ताज्या महिला वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर पोहोचली. अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर ती या स्थानावर पोहोचली आहे.
केट क्रॉस आणि मेगन शुटला मागे टाकताना दीप्ती तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 687 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ती आता सोफी एक्लेस्टोनपेक्षा केवळ 83 गुणांनी मागे आहे. सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दीप्तीने 3.42 च्या इकॉनॉमीने विकेट्स घेतल्या आहेत.
Significant gains for India, New Zealand players in the latest ICC Women’s ODI Player Rankings 📈
More 👇https://t.co/zEQAIs70Q3
— ICC (@ICC) October 29, 2024
दीप्ती टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर असून तिच्यापुढे फक्त एक्लेस्टन आणि सादिया इक्बाल या दोघी आहेत. न्यूझीलंडची लिया ताहुहूनेही गोलंदाजीत तीन स्थानानी प्रगती केली आहेत. ती सध्या 12 व्या स्थानी आहे. न्यूझीलंडची अमेलिया केर 13 व्या स्थानी तर कर्णधार सोफी डिव्हाईन 30 व्या स्थानावर पोहचली आहे.
IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडचे भारतासमोर माफक आव्हान, दीप्ती शर्मानं घेतले 3 बळी…
दुसऱ्या सामन्यात 79 धावा व 3 बळी टिपणारी न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनला एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत फायदा झाला. फलंदाजीत तीने 3 स्थानांनी झेप घेऊन आठव्या स्थान गाठले आहे. डिव्हाईनच्या बरोबरीने मॅडी ग्रीन देखील अव्वल 20 मध्ये पोहचली आहे.





