Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोणची बहीण अनिशा पदुकोण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. देओल कुटुंबियांसोबत अनीशा हिचं नाव जोडलं जात असून तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मात्र लाईमलाइटपासून दूर असलेल्या अनिशाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. अनिशा पादुकोण चं लग्न देओल कुटुंबाचं कनेक्शन असलेल्या रोहन आचार्यशी होणार आहे. रोहन हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांचा पणतू आहे. बिमल यांची नात चिमू आचार्य ही रोहन आणि दृषा आचार्यची आई आहे. रोहन आचार्यची बहीण दृषा आचार्य हिचं लग्न सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलशी झालं आहे. अनिशा ही लग्नानंतर दृषाची वहिनी होणार असल्याने देओल कुटूंबाचे कनेक्शन समोर येत आहे. कोण आहे रोहन आचार्य? रोहन आचार्य हा दुबईतील एक बिझनेसमन आहे. तो दीपिका पादुकोणची धाकटी बहीण अनिशा पादुकोणचा होणारा पती आहे. अनिशा आणि रोहन यांची पहिली भेट रणवीर सिंगच्या कौटुंबिक कार्यक्रमात झाली. दोघे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता दोघे लग्न करणार आहेत. Deepika Padukone | अनिशा ही एक गोल्फर असून तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अनिशाने मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. अनिशा सध्या दीपिकाने २०१५ मध्ये स्थापन केलेल्या ‘द लिव्ह लव्ह लाफ’ फाउंडेशनची सीईओ आहे. Deepika Padukone | दरम्यान, अनीशा आणि रोहन यांचा साखरपुडा झाला असल्याचे देखील म्हंटले जात आहे. पण दीपिका किंवा अनीशा यांनी अद्याप साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाही. Deepika Padukone | हेही वाचा: वॉशिंग्टननंतर कॅलिफोर्नियात गोळीबार ; दोघांचा मृत्यू तर ५ जण जखमी