california shooting। अमेरिकेच्या वॊशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. काल रात्री कॅलिफोर्नियातील लुसिल अव्हेन्यू याठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सॅन जुआक्विन काउंटी शेरिफ कार्यालयाने याविषयी माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे. तसेच लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोळीबारात मुले देखील जखमी california shooting। समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत मुले देखील जखमी झाली आहेत. त्यासोबतच एक २३ वर्षांचा पुरूष जखमी झाला आहे. १२ वर्षांच्या मुलाला घटनास्थळी सीपीआर देण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील रस्ते बंद केले आहेत. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु घटनेनंतर पोलिसांचा वेगवान पाठलाग सुरू आहे, जरी याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. हल्लेखोर किंवा संशयितांबद्दल अद्याप कोणतीही माहिती जाहीर झालेली नाही.