अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंहने नुकतीच आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. या पुरस्कार सोहळ्यात नेहमीप्रमाणे आपल्या हटके फॅशनने रणवीरन सगळ्यांचे लक्ष वेधले होते. रणवीरसोबतच दीपिकाचा पेहरावही तितकाच हटके होता. ज्याच्यावर बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींकडून हटके रिऍक्शन्स आल्या होत्या. त्यातच दीपिका-रणवीरची ही आगळी वेगळी फॅशन सोशल मीडियावर मस्करीचा विषय ठरण्याआधीच दीपिकाने स्वत:ची खिल्ली उडवली आहे.
दीपिकाने सोशल मीडियावर काही मीम्स शेअर केले ज्यात तिने आपल्या आणि रणवीरच्या लूकची तुलना केली होती. दीपिकाची ही विनोदबुद्धी सर्वांनाच खूप आवडली. दीपिकाने शेअर केलेले हे मीम्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. रणवीर हा त्यांच्या जगावेगळ्या हटके फॅशन स्टाइलसाठी ओळखला जातो. रणवीरसोबत लग्न केल्यानंतर दीपिकाही अनेकदा अशा हटके स्टाईलची निवड करताना दिसून आली आहे.
दिपिकाने शेअर केलेल्या मिम्समध्ये तिने आपल्या पर्पल कलरच्या पेहरावाची तुलना फरशी पुसण्याच्या मॉपशी केली आहे तर रणविरच्या लूक्सची तुलना डेस्पिकेबल मी या ऍनिमेशनपटातील बू या पात्राशी केली आहे.