दीपिका पदुकोणने दिले सरप्राइज; ‘किंग’ खानसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली…

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून बाहेर पडली. यानंतर आता दीपिकाने चाहत्यांना एक सरप्राइज दिले आहे. लवकरच ती अभिनेता शाहरुख खानसोबत ‘किंग’ या चित्रपटात सहभागी होणार आहे.
दीपिका पादुकोणने ‘किंग’मधील सहभागाची अधिकृत घोषणा केली. तिने शाहरुख खानसोबत हातात हात घेतलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले, “१८ वर्षांपूर्वी ओम शांती ओम दरम्यान, त्याने मला शिकवलेला पहिला धडा म्हणजे चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि तुम्ही ज्या लोकांसोबत तो बनवता तो अनुभव यशापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. मी यावर खरोखर विश्वास ठेवते आणि मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात त्याचा वापर करते. म्हणूनच आम्ही आमचा सहावा चित्रपट एकत्र करत आहोत.”
View this post on Instagram
ही पोस्ट दीपिकाने शाहरुखला टॅग केले. त्यामुळे आता शाहरुख आणि दीपिका पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचे नक्की झाले आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला चित्रपट ‘ओम शांती ओम’ होता. आता त्यांंना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
‘किंग’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, सुहाना खान, अनिल कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका असणार आहे. Deepika Padukone |
दीपिका ‘कल्की २८९८ एडी २’ चित्रपटातून बाहेर
अलीकडेच, वैजयंती मूव्हीजने दीपिका पदुकोण आता ‘कल्की २८९८ एडी’ च्या सिक्वेलचा भाग नसल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आम्ही अधिकृतपणे जाहीर करतो की दीपिका पदुकोण आता ‘कल्की २८९८ एडी’ चा भाग नाही. खूप विचारविनिमय केल्यानंतर, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या चित्रपटात इतका लांब प्रवास करूनही, आम्ही भागीदारी करू शकलो नाही. ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये वचनबद्धतेची आवश्यकता आहे. तिच्या उर्वरित कामासाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो.” त्यामुळे दीपिका आता ‘कल्की २८९८ एडी २’मधून आऊट तर ‘किंग’मध्ये दमदार एन्ट्री करणार आहे. Deepika Padukone |
हेही वाचा:
छगन भुजबळांच्या त्या विधानानंतर मनोज जरांगेंचा इशारा म्हणाले “जितका त्रास मराठ्यांना दिला…”





