Edible oil prices: खाद्यतेलाच्या आयातीत घट; किंमती वाढणार
Updated On:

नवी दिल्ली, – केंद्र सरकारने खाद्यतेलाची आयात आवश्यकतेपेक्षा जास्त होऊ नये यासाठी आयात शुल्क वाढविले आहे. या प्रयत्नांना यश मिळत असून फेब्रुवारी महिन्यातील खाद्य तेलाची आयात चार वर्षाच्या निचांकावर गेली आहे. त्यामुळे देशात खाद्य तेलाच दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सूर्यफूल तेलाच्या आयातीत घट झाली आहे. मात्र पाम तेलाची आयात अजूनही किंचित जास्त आहे. एका वृत्तसंस्थेने संकलित केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात एकूण खाद्यतेल आयात 12 टक्क्यांनी कमी होऊन 8.84 लाख टनावर गेली आहे. 2021 नंतर प्रथमच फेब्रुवारी महिन्यामध्ये इतक्या प्रमाणात खाद्यतेल आयातीत घट झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये 6.84 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले होते.
टॅग्स:





