Edible Oil: मार्च महिन्यात भारताने 12 लाख टन खाद्यतेल केले आयात; स्वस्त होणार की महाग?
Edible Oil: इंडोनेशिया, मलेशिया या देशातून सध्या आयात वाढली आहे. आगामी काळात किमती जास्त वाढण्याची शक्यता असल्यामुळे आयातदार खाद्यतेलाची आयात जास्त करीत असल्याचे काही विश्लेषकांनी नमूद केले.

Edible Oil: मार्च महिन्यामध्ये खाद्य तेलाची आयात 12 टक्क्यांनी वाढून 11.73 लाख टन इतकी झाली असल्याची माहिती खाद्यतेल उत्पादकाच्या संघटनेने जारी केली आहे. कच्च्या पाम तेलाच्या आयातीत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे.
आता खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. जागतिक बाजारात खाद्य तेलाचे दर जास्त पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळामध्ये खाद्य तेलाची आयात कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मार्च महिन्यामध्ये 10.45 लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती.
एप्रिल महिन्यात कच्चा पाम तेलाची आयात वाढून 6.73 लाख टन इतकी झाली आहे. जी की गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये 3.43 लाख टन इतकी होती. मार्च महिन्यात वनस्पती तेलाची आयात 11 टक्क्यांनी वाढून 11.46 लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये वनस्पती तेलाची निर्यात 10.73 लाख टन इतकी होती.
इंडोनेशिया, मलेशिया या देशातून सध्या आयात वाढली आहे. आगामी काळात किमती जास्त वाढण्याची शक्यता असल्यामुळे आयातदार खाद्यतेलाची आयात जास्त करीत असल्याचे काही विश्लेषकांनी नमूद केले.





