पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट
Updated On:

सोलापूर : भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७१व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. ब्राझीलचे पंतप्रधान हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. तर पंढरपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली आहे.
- पंढरपूरच्या विठुरायाचं इतर दिवशी असलेलं रुप आणि आज सजावटीनंतरचं मंदिराचं रुप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ध्वज तिरंगा प्रमाणे फुलांनी मंदिर परिसर फुलून गेले आहे.
- विशेष दिनाचे औचित्य साधून मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते.
- पुण्यातील धायरी येथील कलाकार तसेच मोरया ग्रुपच्यावतीने ही सजावट करण्यात आलेली आहे.
- भारताच्या तिरंग्याप्रमाणे फुलांची केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.









