लाडक्या बहिणींनो E-KYC कशी कराल? कोणती कागदपत्रे लागणार? २ महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा; कसे ते जाणून घ्या…

Ladki Babin Yojana E-KYC Process | राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने नवा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा आणि गैरप्रकार, घुसखोरी टाळण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी आता ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली.
या निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक महिला व बाल विकास विभागाने जारी केले असून, पुढील दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे, योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल. मात्र E-KYC कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार? याबाबतची प्रश्न जाणून घेऊयात…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/gBViSYZxcm या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 18, 2025
ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल?
१. लाभार्थी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करा.
२. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती अपलोड करावी लागेल. यात तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.
३. तसेच या कागदपत्रांची छायांकित प्रतही अपलडो करायची आहे.
४. त्यानंतर या प्रक्रियेची प्रोसेस पूर्ण होईल.
दरम्यान, लाभार्थींनी 2 महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहिले जाणार नाहीत. म्हणजेच महिलांचा मासिक १५०० हजार रुपयांचा लाभ थांबू शकतो. Ladki Babin Yojana E-KYC Process |
हेही वाचा :





