PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana)ही योजना देशातील कोट्यवधी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत(PM Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ६,००० रुपयांची मदत मिळते, जी तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते. प्रत्येक हप्ता २,००० रुपयांचा. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २१ हप्ते जारी झाले असून, २१वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूतील कोइम्बतूर येथून जारी केला होता. आता शेतकरी वर्ग २२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. योजनेच्या नियमित चार महिन्यांच्या वितरण चक्रानुसार (प्रत्येक हप्ता साधारण चार महिन्यांनी), २१व्या हप्त्यानंतरचा हप्ता फेब्रुवारी २०२६ मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. PM Kisan Yojana विविध माध्यमांतील अहवाल आणि मागील पॅटर्न पाहता, हा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात (उदा. ८ ते २० फेब्रुवारीच्या आसपास) जारी होऊ शकतो. काही ठिकाणी मार्च-एप्रिल २०२६ पर्यंतची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, बहुतेक अहवाल फेब्रुवारी महिन्यावरच भर देत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. आगामी युनियन बजेट २०२६ पूर्वी हा हप्ता जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. या योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळतो आणि सर्व आवश्यक अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर काही अटी पूर्ण न झाल्यास, २२व्या हप्त्यात पैसे जमा होणार नाहीत किंवा ते रोखले जाऊ शकतात. यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत: सर्वप्रथम,eKYC अनिवार्य आहे. योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. eKYC न केल्यास हप्ता अडकतो. याशिवाय, आधार क्रमांक आणि बँक खाते योग्यरित्या लिंक असणे गरजेचे आहे. चुकीचा बँक अकाउंट नंबर, IFSC कोड किंवा आधार लिंक नसल्यास पेमेंट फेल होऊ शकते. दुसरे, कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो. जमिनीचे दस्तऐवज, शेतकरी म्हणून नोंदणी किंवा इतर आवश्यक प्रमाणपत्रांमध्ये चुका असतील तर हप्ता मिळणार नाही. तसेच, काही राज्यांमध्ये Farmer ID अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हे आयडी नाही, त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. विशेषतः बिहारमध्ये लाखो शेतकरी यामुळे प्रभावित होऊ शकतात. याशिवाय, योजनेच्या नियमांनुसार काही श्रेणीतील व्यक्ती (उदा. सरकारी नोकरदार, पेन्शनधारक, आयकर दात्यांच्या कुटुंबातील सदस्य इ.) अपात्र ठरतात. अशा संशयास्पद प्रकरणांमध्ये लाभ तात्पुरता रोखला जातो आणि शारीरिक सत्यापनानंतरच तो सुरू होतो. अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. यानंतर तुम्हाला Know Your Status वर क्लिक करायचे आहे. यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. हे पण वाचा : काॅंग्रेस नेते शशी थरूर यांची नाराजी दूर? दोन तासांच्या बैठकीत काय झाली चर्चा ?