China – रगास चक्रिवादळ हॉंगकॉंग आणि चीनमध्ये धडकले असून गेल्या अनेक वर्षातले आशिया खंडातले हे सर्वात ताकदवान वादळ ठरले आहे. वादळामुळे चीनच्या दक्षिण किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला असून तैवान आणि फिलिपीन्समध्येही या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. तैवानमध्ये बुधवारी वादळामुळे अतिवृष्टी झाल्याने मोठा पूर आला. त्यामुळे रस्त्यावरील वाहनेही वाहून गेली असून १७ जणांचा मृत्यू झाला. फिलिपीन्सच्या उत्तरेकडील भागातही १० जण ठार झाले आहेत. नच्या ग्वांगडोंग प्रांतातील तब्बल २ दशलक्ष लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ;आंगदाओ शहरात वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी २४१ किलोमीटर इतका नोंदवला गेला आहे. रगास चक्रिवादळ चीनमधील यान्जियांग शहरातल्या हेलिंग बेटावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास थडकले. वाऱ्याचा प्रचंड वेगामुळे अनेक झाडे आणि इमारतींना झोडपले. मुसळधार पावसामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. सुरुवातीला सुमारे एक डझन शहरांमध्ये शाळा, कारखाने आणि वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या बोटी खडकांवर आपटून फुटल्या आणि दुकानातील फर्निचर देखील इतरस्ततः विखुरले गेले. पुरात वाहून गेलेल्या काममध्ये अनेक जण अडकून पडले होते. रगास वादळाने वाटेत आलेल्या तैवान आणि फिलिपीन्समध्येही अचेच मोठे नुकसान केले आहे. तैवानमध्ये १७ जण ठार झाले, तर ३२ जण जखमी झाले आहेत. फिलिपीन्समध्ये देखील १० जण ठार झाले असून अनेक मच्छिमार बेपत्ता झाले आहेत. या वादळामुळे जवळजवळ ७ लाख लोक प्रभावित झाले, त्यापैकी २५ हजार लोकांनी सरकारी आपत्कालीन आश्रयस्थानांमध्ये आश्रय घेतला आहे.