Shirur Crime News : शिरूरमध्ये भरदिवसा घरफोडी; शेतात गेलेल्या कुटुंबाच्या घरातून १७ तोळे सोने लंपास
Shirur Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा एक अत्यंत धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे.

Shirur Crime News : शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट फोडून १७ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Shirur Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता बाळासाहेब पडवळ (वय ५२, रा. संविदणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. २१ जुलै रोजी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अजय मोटार बंद करण्यासाठी घरी आला असता मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घरी धाव घेतली. (Shirur Crime News)
घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटे फोडलेली असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता कपाटात ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. (Shirur Crime News)
चोरीस गेलेल्या ऐवजात साडेतीन तोळ्यांचे गंठण, विविध प्रकारची मंगळसूत्रे, सोन्याची चैन, पुरुष व महिलांच्या अंगठ्या, कानातील दागिने आणि कर्णफुले अशा एकूण १७ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत ८ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. (Shirur Crime News)
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपास सुरू आहे. (Shirur Crime News)
दरम्यान, शिरूर तालुक्यात ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीनंतर पोलिसांनी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत. (Shirur Crime News)
Shirur Crime News : शिरूर हादरलं..! शेतातील कामावरून संताप; नातवाकडून आजोबांचा लोखंडी गजाने खून





