Shirur Crime News : शिरूर हादरलं..! शेतातील कामावरून संताप; नातवाकडून आजोबांचा लोखंडी गजाने खून
Shirur Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून कौटुंबिक नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे.

Shirur Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील काम करण्यास सांगितल्याच्या रागातून 26 वर्षीय नातवाने 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. सोमवारी (15 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी नातवाला काही तासांतच ताब्यात घेतले. (Shirur Crime News)
मृत वृद्धाचे नाव दशरथ यशवंत राऊत (वय 84) असे असून, आरोपी सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय 26) याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृतांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी फिर्याद दिली आहे. (Shirur Crime News)
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. दशरथ राऊत यांनी नातू सोमनाथला शेतातील कामाबाबत सूचना केल्या. मात्र, या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. (Shirur Crime News)
रागाच्या भरात सोमनाथने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केले. या भीषण हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Shirur Crime News)
काही तासांत आरोपी जेरबंद
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करत आहेत. (Shirur Crime News)
परिसरात हळहळ
शेतातील काम करण्यास सांगितल्यासारख्या किरकोळ कारणावरून एका नातवाने स्वतःच्या आजोबांची हत्या केल्याने बाभुळसर बुद्रुक गावासह संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेमुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गावकऱ्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Shirur Crime News)





