‘रॉबिन हूड’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी डेव्हिड वॅार्नरची हैद्राबादमध्ये सुपरक्लास एन्ट्री; एअरपोर्टमधून बाहेर येताच चाहते भरावले….

Robin Hood Movie David Warner | वेंकी कुदुमुला दिग्दर्शित आणि नितीन अभिनीत श्रीलीलाच्या ‘रॉबिनहूड’ सिनेमात डेव्हिड वॉर्नर देखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या निर्त्यांनी वॅार्नर याची या सिनेमात भूमिका असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही हा सुखद धक्का होता. वॅार्नर थेट क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच डेव्हिड वॅार्नर या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी सिनेमाच्या प्रमोशसाठी हैद्राबादमध्ये दाखल झाला आहे.
123.com च्या वृत्तानुसार, हैदराबादच्या RGIA विमानतळावर दिग्दर्शक वेंकी कुदुमुला आणि चाहत्यांनी वार्नरचे जोरदार स्वागत केले. HICC नोवोटेल, हैदराबाद येथे आज संध्याकाळी ५ वाजता रॅाबीनहूड सिनेमा प्री-रिलीज कार्यक्रम होणार असून सिनेमाचा ट्रेलर लॅान्च सोहळाही संपूर्ण टीमसोबत पार पडणार आहे. Mythri Movie Makers द्वारे या सिनेमाची निर्मित, GV प्रकाश कुमार यांचे संगीत सिनेमाला देण्यात आले आहे.
त्यामुळेच डेव्हिड सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रमोशन करण्यासाठी हैद्राबादला पोहोचला आहे. ‘रॉबिनहूड’ 28 मार्च 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात येत असून सिनेमाची मोठी चर्चा होत आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये सिनेमा रिलीजची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘रॉबिनहूड’मध्ये वार्नर एका विशेष भूमिकते पाहायला मिळणार आहे.
Grand welcome for @davidwarner31 in Hyderabad ❤🔥
He will attend the #RobinhoodTrailer launch & Grand Pre-Release Event today 💥💥#Robinhood GRAND RELEASE WORLDWIDE ON MARCH 28th.@actor_nithiin @sreeleela14 @VenkyKudumula @gvprakash #RajendraPrasad @vennelakishore… pic.twitter.com/qFE4bp62U6
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) March 23, 2025
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरहीचे या सिनेमातून टॉलिवूडमध्ये पदार्पण मानले जात आहे. त्याच्या भूमिकेबाबत अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्रमोशनसाठी तो हैदराबादला पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नर तेलगू सिनेमाचा, विशेषत: अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाचा मोठा चाहता आहे. रॉबिनहूड एक ॲक्शन-पॅक एंटरटेनर सिनेमा असून अभिनेता नितीनचे चाहते या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहेत. या सिनेमात श्रीलीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.





