सयाजी शिंदे, सचिन खेडेकरनंतर आता ‘या’ अभिनेत्याची साउथमध्ये एन्ट्री

Devdutt Nage | मराठमोळा अभिनेता सयाजी शिंदे, सचिन खेडेकर या कलाकारांनी साउथ सिनेमात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकले आहेत. आणखी काही मराठी कलकारांनी साऊथच्या सिनेमात धूमाकूळ घातला आहे. आता मराठी इंडस्ट्रीतील आणखी एका कलाकाराची साउथ सिनेमात एट्री झाली आहे. रॅाबीनहूड नावाच्या सिनेमात एक मराठी कलाकार दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता नितीन आणि पुष्पा फेम अभिनेत्री श्रीलीला मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय या सिनेमात अॅास्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॅार्नर हा देखील आहे. नुकताच रॅाबीनहूड सिनेमाचा ट्रेलर लॅान्च सोहळा पार पडला असून आता या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे.
रॅाबीनहूड सिनेमात नितीन आणि श्रीवल्ली यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर जो मराठी कलाकार या सिनेमात काम करणार आहे त्याच नाव देवदत्त नागे आहे. देवदत्तने या अगोदर त्याची सर्वांत लोकप्रिय ठरलेली मालिका येळकोट येळकोट जय मल्हारमध्ये खंडोबाची भूमिका साकारली होती.
या मालिकेनंतर खरंतर देवदत्त नागे कोण हे प्रेक्षकांना समजलं. त्याच्याही आधी देवदत्त नागेने अत्यंत गाजलेली मराठी सिरीअल देवयानी मालिकेत काम केलं होतं. आता देवदत्त थेट साउथच्या सिनेमात झळकणार आहे. नुसता झळकणार नाही तर एका विलेनच्या भूमिकेत तो आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये देवदत्त एका विलेनच्या भूमिकेत असल्याचे दिसते. त्याचा लूक अंगावर येणार आहे. दाढी वाढलेला, काळी कपडे घातलेल्या आणि नाकाच्या मध्ये रिंग घातलेल्या देवदत्त ट्रेलरमध्ये दिसत आहे. यामुळे आता एका मराठमोळ्या कलाकाराची साउथमध्ये एन्ट्री झाल्याने सगळ्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. या शुक्रवारी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.
वार्नरचा कॅमिओ
या सिनेमात अॅास्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॅार्नर याचाही छोटा पण लक्षवेधी कॅमिओ असणार आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर लॅान्च सोहळा हैद्राबादमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात वार्नर डान्स करताना पाहायला मिळाला. त्याचा सोशल मीडियावर डान्स करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने आपल्या एक्स हॅन्टलवरून रॅाबीनहूड सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे.
My big screen debut in a super entertaining film. #RobinhoodTrailer out now!
▶️ https://t.co/wtVCfS1g4p#Robinhood GRAND RELEASE WORLDWIDE ON MARCH 28th.@actor_nithiin @sreeleela14 @davidwarner31 @Venky.Kudumula @gvprakash #RajendraPrasad @vennelakish @devdatta.g.nage… pic.twitter.com/JAWhYr5rc2— David Warner (@davidwarner31) March 24, 2025





