डेव्हिड वॅार्नर दिसणार मोठ्या पडद्यावर; साऊथ चित्रपटातून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण, कोणता आहे तो चित्रपट?

डेव्हिड वॅार्नर हा जेवढा आपल्या धडाकेबाज बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे, तेवढचा तो सोशल मीडियावरील त्याच्या रिल्ससाठीही देखील नेहमी चर्चेत असतो. वॅार्नरची खासियत म्हणजे तो भारतातील विविध भाषांमधील गाण्यांवर जास्तीत जास्त रील्स करत असतो. यामुळे त्याच्या फलंदाजीसह त्याचे चाहते त्याच्या रील्सचेही फॅन्स आहेत. डेव्हिडच्या या अदांजाचे दिग्दर्शक राजामौलीही फॅन झाले होते. त्यानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी डेव्हिडसोबत एक जाहिरातही केली. अशातच डेव्हिड वॅार्नरविषयी एक बातमी समोर आली आहे. वॅार्नर साऊथ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
मॅथ्री मूव्ही मेकर्स यांनी त्यांच्या आगामी रॅाबिनहूड चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून डेव्हिडला लॅान्च केले जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. यामुळे लवकरच डेव्हिड वॅार्नर थेट क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या पडद्यावर येणार आहे. वॅार्नर हा अॅास्ट्रेलियन संघाचा उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. रॅाबिनहूड चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकी कुडुमुला करणार आहेत. त्यामुळे वार्नरचे चाहते त्याचा पडद्यावरचा अभिनय पाहण्यासाठी मोठे उत्सुक झाले आहेत.
चित्रपटाची बरीच चर्चा
प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नितीन ‘रॉबिन हुड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता नितीन या चित्रपटात हनी सिंग नावाच्या चोराची भूमिकेत दिसणार आहे. जो गरिबांना मदत करण्यासाठी श्रीमंतांना लुटतो. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरमुळे या चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे. नवीन येरनेनी आणि वाय रविशंकर निर्मित या चित्रपटात श्रीलीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. रॉबिनहूडचे संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे.





