थलमती 69 चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. या चित्रपटाची पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे. ज्यामध्ये अभिनेता विजयचा दमदार लूक दिसत आहे. विजय या वर्षात हा चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विजयचा थलपती 69 हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाच्यानंतर विजय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी थलपती 69 चा फस्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये विजय स्टेजवर उभा असून तो सेल्फी घेताना दिसत आहे. त्याच्या मागे लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. पोस्टरवरून असे दिसते की विजय या चित्रपटात लोकांसाठीच्या नायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे की विजयला जाना नायकन या आवाजाने हाक मारा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन एच विनोथ हे करणार असून या चित्रपटात विजय माजी पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता विजयचा हा शेवटचा चित्रपट असल्याने त्याचे चाहते उत्सुक झाले असून मोठी चर्चा चित्रपटाची होताना दिसत आहे. नुकतेच अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटात एक डान्स सिक्वेन्सही शूट करण्यात आला आहे. कठ्ठी, मास्टर, बीस्ट आणि लिओ या चित्रपटांनंतर अनिरुद्धचा विजयसोबतचा हा पाचवा चित्रपट आहे. थलपती 69 हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट असल्याची माहिती आहे. तसेच विजयसोबत अभिनेत्री पूजा हेगडी या चित्रपटात काम करणार आहे. पूजाचा विजयसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी हे दोन्ही कलाकार 2022 मध्ये नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित बीस्ट चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू, प्रियमणी, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज आणि नारायण मुख्य भूमिकेत असणार आहेत.