दौंड : भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

यवत : दौंड तालुक्याचे माजी तालुकाअध्यक्ष आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तानाजी दिवेकर यांच्यावर आज रविवारी (दि.८) रोजी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुनील खंडाळे आणि एका अज्ञातावर व्यक्तीवर बोरीपार्धी येथील एका महिलेने यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, एक गर्भवती असलेली तक्रारदार महिला एप्रिल महिन्यात केडगाव (ता.दौंड) येथील हॉस्पिटलमध्ये गेली होती.ती हॉस्पिटल मधून बाहेर जाताना या महिलेच्या पतीला तानाजी दिवेकर यांचा फोन आला व काही वेळातच दिवेकर हे सुनिल खंडाळे आणि आणखी एका व्यक्तीबरोबर त्यांच्या इनोवा गाडीमधून तेथे पोहोचले. त्याच गाडीतून दिवेकर आणि तक्रारदार महिला हे सर्वजण केडगाव पोलीस चौकीजवळ आले.
त्यावेळी संबंधित महिलेच्या पतीने आपला जो काही विषय आहे.तो आपण गाडीत बसून बोलून असे सांगितले.त्यानंतर तक्रारदार व तिचा पती हे दिवेकर यांच्या गाडीत बसले. यादरम्यान शेजारी बसलेल्या दिवेकर यांनी तक्रारदार महिलेचा विनयभंग केला.तसेच याबाबत कोठे वाच्यता केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे या महिलेने यवत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.याबाबतचा तपास सहायक पोलीस अधिकारी उत्तम कांबळे करत आहेत.





