Nagar | श्रीरामपूर शहरात स्वतंत्र वाहतूक नियंत्रक कक्षासाठी प्रयत्न करणार – दत्तात्रय कराळे

श्रीरामपूर {प्रतिनिधी} – आज श्रीरामपूर शहरामध्ये विविध उत्सवांचे पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली.
त्यावेळी शहरातील बेशिस्त वाहतूक पार्किंग बाबत बोलताना ते म्हणाले श्रीरामपूर शहरामध्ये वाढती वाहतूक बघता शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याकरता वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर प्रयत्न करू.
तसेच त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी यांना शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच इतर ठिकाणी असलेल्या बेशिस्त वाहन पार्किंग काढून वाहतूक सुरळीत करण्यात बाबत सूचना केल्या,
शहरामध्ये विविध ठिकाणी फेरीवाले तसेच बेशिस्त पार्किंग यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो शहरातील मुख्य रस्त्यावर दुकानासमोरील पार्किंग, हातगाड्या बेशिस्त लावल्यामुळे मुख्य रस्ता फक्त निम्माच वापरायला मिळतो तेवढ्यात जागेतून वाहनांची वाहतूक तसेच नागरिकांची वर्दळ असते, त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली,
त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुंजे, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आदी. उपस्थित होते.





