nagar | श्रीरामपुरात सवलतीच्या दरात साखर वाटप

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या ऊस उत्पादकांनी दहा टनाच्या पुढे उसाचा पुरवठा केलेला आहे, अशा ऊस उत्पादकांना ४० किलो साखर २० रुपये किलो दराप्रमाणे प्रवरा कारखान्यामार्फतसवलतीच्या दरात देण्यात येत असल्याची माहिती चेअरमन कैलास तांबे यांनी दिली.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून श्रीरामपूरकरांची दिवाळी गोड केली. यापूर्वीही श्रीरामपूरकरांसाठी विविध विकास कामाच्या माध्यमातून शहरासाठी भरीव मदत करण्यात आली आहे.
मागीलवर्षी 2023 -2024 मध्ये अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या ऊस उत्पादकांनी दहा टनाच्या पुढे उसाचा पुरवठा केलेला आहे, अशा ऊस उत्पादकांना ४० किलो साखर २० रुपये किलो दराप्रमाणे सवलतीच्या दरात प्रवरा कारखान्यामार्फत देण्यात येणार आहे.
सदर साखर वाटपाचे नियोजन शेतकी विभागांनी केलेले आहे. ६ ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत साखरेचे वाटप शुभम सांस्कृतिक भवन, बाभळेश्वर रोड येथे केले जाणार आहे.
यावेळी चेअरमन कैलास तांबे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे ,भानुदास ताबे, सतिश ससाणे , संचालक संजय आहेर , संचालक गणपत चेचरे , शेतकी अधिकारी विठ्ठल बेंद्रे , रामराव शेटे व ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
अशा वेळी विखे पाटील यांनी सभासदांशी असणारा ऋणानुबंध जपत २० रुपये प्रति किलो दराने साखर देत सर्वांसमोरच एक वेगळा आदर्श ठेवला आहे. प्रवरा सहकारी साखर कारखान्याने अशोक कारखानापेक्षा 500 रुपये शेतकऱ्यांना वाढीव ऊसाला भाव दिला होता.
दिवाळीचा गोडवा तर वाढवला आहेच पण होऊ घातलेल्या हंगामापूर्वी चांगलीच साखरपेरणी देखील केली आहे. यावर्षी ऐन नवरात्रोत्सवातच दिवाळीसाठी देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप करण्यात येत आहे.





