स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयात हजर करणार ; वैद्यकीय चाचणी पूर्ण

Dattatray Gade Arrested । स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा मागील 70 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो शुक्रवारी पहाटे दीड वाजता पोलिसांनी त्याला जेरबंद केले. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील कॅनालमध्ये तो लपला होता. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने त्याला शिताफीने पकडले. यावेळी ग्रामस्थांनीही पोलिसांना मदत केली. नातेवाईकाच्या घरी गेला होता तिथून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाने दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
न्यायालयात हजर करण्यात येणार Dattatray Gade Arrested ।
गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला अटक केली. तो एका कॅनॉलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गावातल्या शेतात अनेक तास शोधमोहिन केल्यानंतर अखेर त्याच शोध लागला. पोलिसांनी शेत पिंजून काढत त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार Dattatray Gade Arrested ।
* आरोपी दत्तात्र गाडे हा गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
* काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही.
* रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता.
* तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली.
* पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच गाडेला चारही बाजूंनी घेरलं
* ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला तू बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा पोलिसांनी केली
* त्यानंतर कॅनालच्या खड्ड्यात लपलेला दत्ता गाडे हा आरोपी बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली
* मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
* महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षीा जास्त हे सर्च ऑपरेशन सुरू होतं.
* गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.
हेही वाचा
भारतासह चार देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के ; नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानची जमीन हादरली





