भारतासह चार देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के ; नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानची जमीन हादरली

Earthquake । भारतासह चार देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. अवघ्या तीन तासांत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानच्या अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आज सकाळी नेपाळमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के संपूर्ण हिमालयीन प्रदेशात जाणवले. भूकंपाचे धक्के दोनदा जाणवले. पहिल्यांदा भूकंप काठमांडूजवळ झाला आणि दुसऱ्यांदा बिहार सीमेजवळ झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र नेपाळ होते. या भूकंपात अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
एका वृत्तसंस्थेनुसार, नेपाळमधील सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरव कुंडाजवळ पहाटे २.३५ वाजता भूकंप झाला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी मोजली, तर भारताच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने त्याची तीव्रता ५.५ इतकी नोंदवली.
६.१ तीव्रतेचा भूकंप हा शक्तिशाली Earthquake ।
६.१ तीव्रतेचा भूकंप हा शक्तिशाली मानला जातो आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. या काळात इमारतींमध्ये भेगा देखील दिसू शकतात. त्याच वेळी, मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.
“यामुळे आमची झोपमोड झाली. आम्ही आमच्या घराबाहेर पडलो. लोक आता त्यांच्या घरी परतले आहेत. आम्हाला अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुखापत झाल्याचे वृत्त मिळालेले नाही,” असे नेपाळचे वरिष्ठ अधिकारी गणेश नेपाली यांनी रॉयटर्सला सांगितले.
सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ
त्याच वेळी, पटनामध्ये भूकंपामुळे इमारती आणि छताचे पंखे थरथर कापत असल्याचे व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले. एका वापरकर्त्याने सांगितले की भूकंपाचे धक्के सुमारे ३५ सेकंदांपर्यंत जाणवले. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘बिहारमधील पटना येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सगळं काही हादरत होतं, पण अजून काहीही नुकसान झालेलं नाही.
इंडोनेशियामध्येही झाला भूकंप Earthquake ।
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी इंडोनेशियात ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. उत्तर सुलावेसी प्रांताजवळील समुद्रात सुमारे १० किलोमीटर (६.२ मैल) खोलीवर भूकंप झाला.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:५५ वाजता (२२५५ GMT) झाला. देशाच्या हवामान संस्थेने त्सुनामीची शक्यता नाकारली होती.





