डॅशिंग शिवानी शिवाजी रॅाय पुन्हा भेटीला! ‘मर्दानी 3’ सिनेमाचं दमदार पोस्टर समोर; या दिवशी होणार रिलीज

Mardaani 3 movie poster : अभिनेत्री राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ हा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने राणीला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. थोडक्यात तिच्या करिअरला ब्रेथ्रू देण्याचं काम या सिनेमाने केलं. त्यानंतर या सिनेमाचा मर्दानी २ हा सिनेमा २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमालाही प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिला. यानंतर आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून, मर्दानी ३ सिनेमाचं पहिलं दमदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मर्दानी ३ या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॅाय मर्दानी ३ च्या द्वारे दमदार कमबॅक करणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमधून सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
२७ फेब्रुवारी २०२५ म्हणजेच पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं दमदार पोस्टर लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरमधून इतर कलाकारांची माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण अभिनेत्री राणी मुखर्जी ही याही भागात मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनवाल यांनी केलं आहे, तर सिनेमाचे निर्माते सिद्धार्थ कपूर हे आहेत. या सिनेमाचं पोस्टर यशराज फिल्म्स यांनी त्यांच्या अॅाफिशयल अकाऊंटवरून शेअर केलं आहे.
हेही वाचा : ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच मलायका आणि अर्जुन कपूर दिसले एकत्र





