Baaghi 4 song : ये मेरा हुस्न गाण्यावरील हरनाजच्या डान्सने चाहते घायाळ!

Baaghi 4 song : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॅाफ याचा बागी ४ सिनेमाचा ट्रेलर झाला. या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ५ सप्टेंबर या दिवशी बॅागी ४ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ये मेरा हुस्त्र हे नव गाण रिलीज झालं आहे. या गाण्यात हरनाज कौर सिंधूचा डान्स मेव्ह्यूजने चाहत्यांना घायाळ केलं आहे. या गाण्याची तुलना अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बेशरम रंग या गाण्यासोबत केली जात आहे.
साजिद नाडियाडवाला आणि टायगर श्रॉफ यांच्या अॅक्शन सिनेमात हरनाज कौर संधूने तिच्या हॉट डान्स मूव्ह्सने धुमाकूळ घातला आहे. हे गाण्याचा व्हिडीओ टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘#ये मेरा हुस्न आता रिलीज होत आहे, या गाण्याच्या प्रत्येक बीटने उत्साहित व्हा. अॅडव्हान्स बुकिंग आता सुरू होत आहे.
या गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को यांनी केली आहे. तर गाण्याला शिल्पा रावचा मखमली आवाज आहे. तनिष्क बागचीचे संगीत आणि समीर अंजानच्या बोलांमुळे हे गाणं आणखी आकर्षक झालं आहे. टायगरने शेअर केलेल्या या गाण्याच्या पोस्टवर चाहत्यांना कमेंट्स केल्या आहेत. मला विश्वासच बसत नाहीये की हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे… किती छान स्क्रीन प्रेझेन्स आहे, अशी कमेंट करून चाहत्याने अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
या गाण्यात संजय दत्त आणि टायगर श्रॉफ देखील त्यांच्या दमदार शैलीत दिसले आहेत. हे गाण्याने प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला आहे.





