Kareena Kapoor : बॅालिवूड सिनेमा इंडस्ट्रीत ‘बेबो’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूर हिचा आज ४५ वा वाढदिवस आहे. खरंतर करिनाने आजवर अनेक हिट हिंदी सिनेमे दिले आहेत. तिच्या अनोख्या स्टाईलने ती नेहमी चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. तिचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. मात्र, बेबोने एका मुलाखतीत स्वतःतेचे सिनेमे पाहत नसल्याचं म्हटलं आहे. तिचे हे उत्तर ऐकून चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. याबाबत करिना कपूरने खुलासा केला आहे. याबाबत सांगताना करिना म्हणाली, तिला स्वतःला पडद्यावर पाहणे आवडत नाही, कारण यामुळे ती घाबरते आणि जास्त विचार करते. म्हणूनच ती तिची बहीण करिश्मा आणि आई बबिता यांना तिचे सिनेमे पाहण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी सांगते. पण पुढे ती असंही म्हणाली, सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी ती पाहते, जेणेकरून ती अधिक सहजपणे सिनेमे पाहू शकते, असा खुलासा करिनाने मुलाखतीत केला आहे. अभिनेत्री करिना कपूर हिने २००० मध्ये ‘रिफ्यूजी’ या सिनेमातून बॅालिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ती कभी खुशी कभी गम, जब वी मेट, ३ इडियट्स या यांसारख्या सिनेमात दिसली. त्यानंतर तिने अनेक सिनेमे केले. अभिनेता सैफी अली खानसोबत लग्न झाल्यानंतरही करिनाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं. तिच्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळं स्थान निर्माण केलं. हेही वाचा: देशातल्या ‘या’ मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी ; जाणून घ्या का घेतला हा निर्णय ?