आयकॅान स्टार अल्लू अर्जुनची बॅालीवूडमध्ये एन्ट्री? आमिर खानच्या भेटीने चर्चांना उधान, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Aamir met Allu Arjun : सध्या सोशल मीडियावर साऊथचा आयकॅान स्टार अल्लू अर्जुन आणि बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या भेटीचा फोटो व्हायरल होत आहे. या दोघांची मुंबईत भेट झाली असून या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आमिरच्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून अल्लू बॅालीवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अल्लूने मुंबईतील आमिरच्या घरी जाऊन भेट घेत आहे.
२०२३ च्या सुरुवातीला दोघे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये संवाद साधताना पाहिला मिळाले होते. यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या भेटीमुळे हे भेट नव्या प्रोजेक्टची नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांची मुंबईत आमिरच्या घरी झालेली भेट नव्या प्रोजेक्टबद्दल झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र,, अद्यापर्यंत दोघांनीही या भेटीबाबत कोणताही खुलासा केला नसून नेमकी ही भेट कशाकरता होती याबदद्दल माहिती दिलेली नाही.
. #AlluArjun meets #AamirKhan at his residence. pic.twitter.com/YtpEdODw4U
— #SINGLE S K R (@skrcinepro) May 6, 2025
आमिर त्याच्या आगामी सितारे जमीन पर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हिची देखील विशेष भूमिका असणार आहे. हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या आगामी पुष्पा ३ च्या तयारीत व्यस्त असून तो लवकरच दिग्दर्शक अॅटलीसोबत ‘AA22xA6’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक सायन्स फ्रिक्शन चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.





