Pooja Hegde: ऋतिक रोशनपासून अक्षय कुमारपर्यंत; या अभिनेत्यांसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे… जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

Pooja Hegde: दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री पूजा हेगडे आज बॉलिवूडमधील ओळखले जाणारे नाव आहे. तीने ऋतिक रोशन, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि सलमान खानसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. आज पूजा हेगडेचा 35 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्या बॉलिवूड चित्रपटांचा आढावा घेऊया.
१. मोहनजोदडो (2016)
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात ऋतिक रोशन आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होते. पूजा हेगडेनं या चित्रपटात छानी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट सिंधू संस्कृतीच्या काळावर आधारित असून एका शेतकऱ्याची अन्यायाविरुद्धची लढत दाखवतो. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही, तरी पूजाच्या अभिनयाचं कौतुक झालं.
२. हाऊसफुल 4 (2019)
फरहाद सामजी दिग्दर्शित या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमार, कृति सेनन, बॉबी देओल, कृति खरबंदा यांच्यासह पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत होती. तिने या चित्रपटात राजकुमारी माला आणि आधुनिक काळातील पूजा अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित असून प्रेक्षकांना चांगलाच हसवणारा ठरला.
३. सर्कस (2022)
रोहित शेट्टी दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. पूजाने या चित्रपटात माला ही भूमिका केली होती. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
४. किसी का भाई किसी की जान (2023)
या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडेनं भाग्यलक्ष्मी ही भूमिका साकारली. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट जरी मोठ्या अपेक्षेने प्रदर्शित झाला होता, तरी तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.
पूजा हेगडेनं अल्पावधीतच दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचं सौंदर्य, अभिनय आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टींमुळे ती आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते.





