दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

Vaishnavi Hagavane death case : सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनी काल पत्रकार परिषद घेत पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेत दमानिया यांनी अॅडिओ क्लिप देखील ऐकवली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही अॅडिओ क्लिप जालिंदर सुपेकर यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या अॅडिओ क्लिपमध्ये जालिंदर सुपेकर एका पोलिस अधिकाऱ्याशी संवाद साधत आहे. या प्रकरणातून माझं नाव काढा असे सुपेकर अॅाडिओ क्लिपमध्ये त्या पोलिस अधिकाऱ्याला म्हणत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. मात्र, या कथित अॅडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी केली जात नाही.
जालिंदर सुपेकर हे शशांक हगवणे म्हणजेच वैष्णवीच्या नवऱ्याचा सख्या मामा असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून सून आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले. दोन्ही सूनांना गप्प बसण्याची धमकी देण्यात आली, असा सनसनाटी आरोप केला आहे.
कथित अॅडिओ क्लिकमध्ये काय?
कारण नसताना त्यात माझं नाव कशाला टाकता? असे सुपेकर पोलीस अधिकाऱ्यांना विचारत आहेत. मी साहेबांना बोलतो, तुम्हाला फोन जोडून देतो असे उत्तर पोलीस अधिकारी समोरुन सांगतो. यासाठी दुसरे निवदेन तयार करा आणि त्यातून माझे नाव काढा असे सुपेकर सांगतात. त्यांनी काय निवेदन केले मला माहिती नाही पण त्यात तुमचे नाव आहे, असे सुपेकर सांगतात. मला काय फायदा होईल, असे पोलीस अधिकारी विचारतो. यात शंभर टक्के फायदा होणार असे सुपेकर सांगताना या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकू येते.
ह्याला म्हणतात कर्तव्यदक्ष पोलिस SP
एसपी नवनीत कावत यांना सलाम !
ही खरंच खूप मोठी बातमी आहे
ना भूतो ना भविष्यति अशी ऑर्डर काढून ६०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या अधिकाऱ्यांनी केल्या.
आढावा बैठक घेऊन, निकष निश्चित करून त्यांनी या बदल्या केल्या
विहित पाच वर्ष कालावधी… pic.twitter.com/cYMkwjeSGy
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 24, 2025
दमानियांचा गंभीर आरोप
सामिजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पीएसआय अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातही मोठा दावा केला आहे. सुपेकर यांनी सादरे यांना दोन महिन्यांचे पैसे आणि दिवाळीचे सोने न दिल्याने त्यांचा मानसिक छळ केला, ज्यामुळे सादरे यांनी आत्महत्या केली, असे सुसाईड नोटचा हवाला देत त्यांनी दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकारी शिरखर परदेशी यांच्याकडे 500 कोटींच्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
सुपेकर यांची बाजू काय?
दमानिया आणि ठोंबरे यांनी केलेल्या आरोपांवर डॅा सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. हगवणे कुटुंब माझे दूरचे नातेवाईक आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून माझा त्यांच्याशी संपर्क नाही. मी स्वतः दोन मुलींचा पिता आहे आणि असा जघन्य कृत्याला कोणताही पिता पाठिंबा देऊ शकत नाही. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.





