औरंगाबादेत पेटवलेल्या दलीत महिलेचे निधन
Updated On:

औरंगाबाद : घरात घुसण्यास विरोध केल्याने पेटवून दिलेल्या 50 वर्षीय महिलेचे बुधवारी रात्री निधन झाले, अशी माहिती पोलिसांनी गुरूवारी दिली.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही घटना घडली होती. यात या महिला 50 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे बुधवारी निधन झाले, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता सुरेश हरबडे यांनी सांगितले.
या प्रकरणी सुरेश मोहीते (वय 50) या शेजाऱ्याला अटक करण्यात आली. दरम्यान हा खटला जलदगती न्यायलयात चालवावा अशी मागणी खासदार इप्तियाज जलील यांनी केली.
टॅग्स:





