“त्यांनी कधी शेतकऱ्यांची गळाभेट घेतल्याचे पाहिले का ?” ; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

Rahul Gandhi on Modi। बिहार निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र आरोप केले आणि असा दावा केला की मोदी सरकारने देशातील सर्व सरकारी कंपन्या विकल्या आहेत आणि सर्व काही अदानी आणि अंबानी सारख्या उद्योगपतींना दिले आहे.
राहुल गांधी यावेळी बोलताना, “तुम्ही कितीही अभ्यास केला तरी परीक्षेच्या दोन दिवस आधी पेपर लीक होतो. आम्हाला असा बिहार नको आहे.” असे म्हणत केंद्रावर टीका केली. त्यांनी पुढे म्हटले की, “आज देशात दोन भारत निर्माण झाले आहेत: एक अब्जाधीश आणि सूट घालणाऱ्यांसाठी आणि दुसरा गरीब, शेतकरी आणि मजुरांसाठी” असे म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच “मोदी अब्जाधीशांच्या लग्नात जातात आणि त्यांच्यासोबत नाचतात आणि गातात. तुम्ही कधी त्यांना शेतकऱ्याची गळाभेट घेताना पहिले आहे का? तुम्ही कधी त्यांना कामगाराचा हात धरताना पाहिले आहे का?” असे सवाल करत मोदींवर टीका केलं .
काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला Rahul Gandhi on Modi।
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी, “जर संविधान जपले नाही तर देशात फक्त मोदी, अदानी आणि अंबानीच टिकतील. बाकी सर्वांचे हक्क जातील.” असे म्हणाले. तसेच पुढे त्यांनी, “सरकारी विमा योजना शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन खाजगी कंपन्यांना देण्याचा एक नवीन मार्ग बनल्या आहेत. पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करताना ते म्हणाले, “मोदींना माहिती आहे की त्यांनी छठच्या वेळी स्वतःसाठी आंघोळीसाठी वेगळे स्वच्छ पाणी मागवले, तर सामान्य बिहारींना यमुनेच्या साचलेल्या पाण्यात आंघोळ करावी लागत होती.” राहुल गांधी म्हणाले, “आमचे ध्येय बिहारमध्ये रोजगार निर्माण करणे आणि बँकांचे दरवाजे फक्त अदानी आणि अंबानींसाठीच नव्हे तर तरुणांसाठी उघडणे आहे.”
राहुल गांधी इंडिया अलायन्सबद्दल काय म्हणाले? Rahul Gandhi on Modi।
त्यांनी आश्वासन दिले की,”जर इंडिया अलायन्स सत्तेत आले तर बिहारमध्ये नालंदा विद्यापीठासारखी नवीन जागतिक दर्जाची विद्यापीठे बांधली जातील, जिथे परदेशी विद्यार्थी देखील शिक्षण घेण्यासाठी येतील.” राहुल म्हणाले, “नोटाबंदी आणि दोषपूर्ण जीएसटीमुळे बिहारमधील तरुणांचा रोजगार हिरावून घेतला गेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की नोकऱ्या नसल्याने लोक रील बनवत आहेत. बिहारमध्ये मोदीजींनी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली आहे आणि ती अदानींना दिली आहे. अमित शहा म्हणतात की बिहारमध्ये उद्योग उभारण्यासाठी जमीन नाही, परंतु अदानी नेहमीच जमीन शोधतात.”





