बाप रे..! १० निवडणूक कर्मचाऱ्यांसह बिहारमध्ये उष्माघाताचे १४ बळी

Heatstroke in Bihar – बिहारमध्ये गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे १० निवडणूक कर्मचाऱ्यांसह एकूण चौदा जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या निवेदनात, सर्वाधिक मृत्यू भोजपूरमध्ये झाले आहेत.
जेथे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पाच अधिकाऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. रोहतासमध्ये तीन निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि कैमूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
राज्याच्या विविध भागांत अन्य चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने राज्यात उन्हाचा तडाखा बसला आहे.
गुरुवारी बक्सर येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेच्या लाटेमुळे सर्व शाळा, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्र ८ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.





