Sun of Sardar 2 : तब्बल 13 वर्षांनंतर दुसरा भाग! अजयचा डॅशिंग लूक समोर; सन अॅाफ सरदार 2 ‘या’ दिवशी होणार रिलीज

Sun of Sardar 2 : १३ वर्षांची प्रतीक्षा आता संपली असून २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाच्या सिक्वलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सन अॅाफ सरदार २ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. या पोस्टरमधून अभिनेता अजय देवगणचा डेशिंग लूक देखील समोर आला आहे. यामुळे आता या चित्रपटाची मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
अजय देवगणने ‘सन ऑफ सरदार २’ चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, या पोस्टरमधून तो त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून त्याच्या फूल और काँटे चित्रपटाची आठवण झाली आहे. या चित्रपटात अजयची अनोखी एन्ट्री पाहायला मिळाली होती. दोन बाईकवर दोन्ही पाय ठेवून अजयने एन्ट्री केली होती. त्यानंतर अनेकदा हिच स्टाईने त्याच्या अनेक चित्रपटात देखील पाहायला मिळाली. आता ही स्टाईल त्याच्या सन अॅाफ सरदार २ चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळत आहे.
अजय द रिटर्न अॅाफ सरदाराच्या पोस्टला ‘द रिटर्न ऑफ सरदार। #SOS2 लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात असे कॅप्शन दिले आहे. २५ जुलै रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.
मुकुल देवची आठवण
चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर दिवंगत अभिनेते मुकल देव यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात त्यांनी टोनी ही व्यक्तीरेखा साकारलेली होती. २३ मे २०२५ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी मुकल देव यांचे निधन झाले. तशा कमेंट्स देखील चाहत्यांनी पोस्टवर केल्या आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजयसोबत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, जुही चावला, विंदू दारा सिंग हे कलाकार होते. दुसऱ्या भागात अजय देवगण, संजय दत्त यांच्यासोबत मृणाल ठाकूर, संजय मिश्रा, रवी किशन, कुब्रा सैत हे कलाकार देखील असणार आहेत. सन अॅाफ सरदार २ चे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केले आहे.





