हिंगोली :मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. भूकंप हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ परिसरात झाल्याची माहिती सर्वप्रथम समोर आली. मात्र, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे प्राथमिक निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. या भागात काही सेकंद जमीन हलल्याची जाणीव नागरिकांना झाली. सदरील घटना आज दिनांक 11 एप्रिल शनिवार रोजी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा 4.7 रिश्टर स्केलच्या धक्क्याने हिंगोली सह परभणी नांदेड वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले शासकीय क्षेत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे दर्शविण्यात आला असून त्याची खोली 10. कि मी नोंदवण्यात आली आहे (Earthquake tremors) Earthquake tremors : मराठवाडा भूकंपाने हादरला! हिंगोलीसह, परभणी, नांदेडला भूकंपाचे सौम्य धक्के या भूकंपाची नोंद लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर करण्यात आली आहे मराठवाड्यातील भूकंपकीय हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणांनी तात्काळ या घटनेची माहिती संकलित केली अधिकृत आकडेवारीनुसार भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असली तरी काही ठिकाणी कंप स्पष्टपणे जाणून घेणे आहे हिंगोली सह नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले अनेक नागरिकांनी घरातील वस्तू हल्ल्याचे सांगितले काही ठिकाणी लोक घाबरून घराबाहेर धावले मात्र सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क (Earthquake tremors) प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये शांत रहावे आणि कोणतेही आपण परिस्थिती देण्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सत्कार करण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे दरम्यान मराठवाडा हा भूकंप किंवा पट्टा मांडला जात असल्याने अशा घटनांनी पुनरावृत्ती होत आहे त्यामुळे नागरिकांनी सत्कार करून सुरक्षिततेच्या उपाय योजना पाळाव्यात असे आव्हान अज्ञान करून करण्यात आले आहे हेही वाचा : Mahatma Jyotiba Phule: महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती; त्यांच्या विचारांतून काय शिकायला हवं?