Weather Update: बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळाची निर्मिती; महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
Weather Update : पुण्यात सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी

Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदाट बॅटिंग केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच काही ठिकाणी वाहतूक देखील मंदावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर या पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी चिंतेत पडले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असलेले हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आयएमडीनुसार हे वादळ ३ नोव्हेंबरच्या सकाळी नेल्लोर आणि नरसपूरदरम्यान आंध प्रदेशची किनारपट्टी ओलांडू शकते.
या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर आणि झंझावाताचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या पार्श्वभूमीवर आज राज्यातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदरी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या मध्य महाराष्ट्र व कोकणातील भागांमध्येही काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळू शकतात.
राज्यातील उर्वरित भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. यामुळे तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा:





