Ladki Bahin Yojana: दिवाळापूर्वी लाडक्या बहिणींना सरप्राइज! सप्टेंबरचे 1500 रुपये खात्यात जमा…
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरली

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या लाभाची रक्कम कालपासून देण्यास सुरुवात झाली आहे.
दिवाळीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची अनेक महिना महिला प्रतिक्षा करत होत्या. अखेर सरकारने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड केली. पुढील आठवड्यात दिवाळीला सुरूवात होत आहेत, त्यापूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला.
राज्याच्या राजकारणात लाडकी बहिण योजना ही गेम चेंजर ठरली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं ही योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र समाजकल्याण विभागातील अनेक योजनांचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
Old Pune-Mumbai highway: मुख्य मार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा; १० मिनिटांच्या अंतरासाठी दीड तास






