पर्यावरणाच्या संदेशासाठी दोन तरूणांचा पुणे ते हैदराबाद सायकल प्रवास
Updated On:

पुणे : पुण्यातील दोन तरूणांनी “सायकल चालवा-पर्यावरण वाचवा’ संदेश देत पुणे ते हैदराबाद 576 किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करून नववर्षाच स्वागत केले. दोघांनी 1 ते 4 जानेवारी याकालावधीत दररोज सुमारे 150 किलोमीट प्रवास करत हे आंतर पार केले.
प्रदीप कसारीकर-पाटील आणि गणेश थोरात अशी त्या दोघांची नावे आहेत. वाटेत येणाऱ्या गावातील नागरिक, शालेय मुलांना त्यांनी सायकल चालविल्यामुळे होणारे फायदे कथन केले.
सायकल चालविल्याने पेट्रोल, पैशाची बचत होते, पर्यावरणाचे संवर्धनाची माहिती दिली. “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश दिला. जर प्रत्येक माणसाने दररोज 5 किलोमीटर सायकल चालविली, तर वर्षागाठी प्रत्येकी 50 ते 60 लीटर इंधनची बचत होईल. वायू प्रदुषण कमी होईल. ज्यांना शक्य आहे, त्यांनी ऑफीसला जाताना सायकलचा वापर करण्याचे आवाहन दोघांनी केले आहे.





