West Indies Revenue : ‘भारत २५० कोटी कमावणार अन् आम्हाला १ पैसाही नाही…’, वेस्ट इंडिज का संतापला? ICCवर उपस्थित केला सवाल प्रश्नचिन्ह
West Indies Revenue : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान, क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ ख्रिस डेरिंग यांनी द्विपक्षीय मालिका महसूल मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भारताने या मालिकांमधून मोठा नफा कमावला असल्याचा दावा केला आहे.

Cricket West Indies CEO Chris Dehring Slams ICC Revenue Model Over India Tour Earnings : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रोमांचक टी-२० मालिका रंगलेली असतानाच क्रिकेट वेस्ट इंडिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस डेरिंग यांनी आयसीसीच्या द्विपक्षीय महसूल वाटपावर जोरदार हल्ला चढवला आहे. सध्याच्या मालिकेचा संदर्भ देत डेरिंग यांनी खंत व्यक्त केली की, विंडीजच्या या भारत दौऱ्यामुळे यजमान बीसीसीआय जवळपास २० ते ३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १६० ते २५० कोटी रुपयांची भरभक्कम कमाई करेल; मात्र पाहुणा संघ म्हणून विंडीजच्या पदरात एक रुपयाही पडणार नाही. द्विपक्षीय मालिकेतील सर्व महसूल केवळ यजमान देशाकडेच राहण्याच्या नियमाने कॅरेबियन क्रिकेटचा कणा मोडला असून खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
१९९७ मधील तो मतदान निर्णय विंडीजच्या मुळावर –
विस्डेनच्या पॉडकास्टमध्ये बोलताना डेरिंग यांनी भूतकाळातील घटनांचा पाढा वाचला. १९९७ पूर्वी जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ परदेश दौऱ्यावर जायचा, तेव्हा बोर्डाला एक निश्चित टूरिंग फी मिळायची. अनेकदा ही रक्कम कॅरेबियन भूमीवर मालिका खेळवून मिळणाऱ्या कमाईपेक्षाही जास्त असायची, कारण तेव्हा विंडीज जगातील सर्वात लोकप्रिय संघ होता. मात्र आयसीसीच्या बैठकीत हा नियम बदलण्यासाठी मतदान झाले, तेव्हा वेस्ट इंडिजच्या विरोधात ९-१ असा कौल मिळाला. हा नियम विंडीज क्रिकेटचा महसूल हिरावून त्याचा अंत ठरवेल, असा इशारा आपण तेव्हाच दिला होता, असे डेरिंग यांनी सांगितले.
१.४ अब्ज लोकसंख्या विरूद्ध छोटे द्वीप; उत्पन्नाची मोठी दरी –
🗣️ “You’ve just signed the demise of West Indies cricket” 📉
Cricket West Indies CEO Chris Dehring on the financial crisis facing cricket in the Caribbean, and how it all began nearly 30 years ago 💰🌴
Watch The Scoop 👉 https://t.co/KeAokBgwt0 https://t.co/2AZ1Dcgb2m
— Wisden (@WisdenCricket) October 15, 2026
डेरिंग यांनी उत्पन्नातील प्रचंड तफावतीकडे लक्ष वेधले. सध्याच्या नियमानुसार भारत आपल्या १.४ अब्ज लोकसंख्येच्या प्रचंड बाजारपेठेतून निर्माण होणारा सर्व नफा स्वतःकडे ठेवतो, तर वेस्ट इंडिजला अँटिग्वा (१ लाख लोकसंख्या) किंवा सेंट किट्स (३० हजार लोकसंख्या) यांसारख्या चिमुकल्या बेटांवरील नफ्यावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत आर्थिक समतोल पूर्णपणे ढासळला आहे.
आयसीसीच्या वाट्यातही तफावत; बीसीसीआयला ३८ टक्के तर विंडीजला अवघे ५ टक्के
🔴WEST INDIES GETS ZERO MONEY FROM INDIA SERIES? 🤯
– Cricket West Indies CEO Chris Dehring says the board receives no revenue from the series played in India.
– The BCCI can earn millions, while West Indies get nothing from the series’ broadcasting revenue.
– He says the current revenue model is unfair & is contributing to West Indies cricket’s financial problems.
Should the ICC change this revenue-sharing system?💔
— Sam (@cricsam02) October 16, 2026
द्विपक्षीय मालिकांव्यतिरिक्त आयसीसीच्या एकूण महसूल वाटपातही प्रचंड असमानता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयसीसीच्या महसुलातील सिंहाचा वाटा म्हणजे तब्बल ३८ टक्क्यांहून अधिक मिळतो, तर वेस्ट इंडिजच्या वाट्याला केवळ ५ टक्के निधी येतो. परदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या पाहुण्या संघांना जोपर्यंत सामन्यांच्या उत्पन्नातून वाजवी हिस्सा दिला जात नाही, तोपर्यंत लहान क्रिकेट बोर्डांचे अस्तित्व धोक्यात राहील, असा थेट इशारा त्यांनी दिला.





