\n

खरेतर हे मैदान शहरापासून काहीसे लांब आहे. त्यातच संघ सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलात उतरला. त्यामुळे खेळाडूंना पाहण्यासाठी आधी या हॉटेलच्या बाहेर तर नंतर सामना पाहण्यासाठी गहुंजेच्या मैदानावर पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राखली. जे चित्र याच स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अहमदाबादमध्ये दिसले तेच गुरुवारी पुण्यातील या मैदानावर दिसले.

\n

\"\"

\n

संपूर्ण मैदानावर फक्त निळी चादर पसरल्याचे वाटत होते. भारतीय संघाला मेन इन ब्ल्यु म्हटले जाते तसेच मैदानावरही पुणेकर्स इन ब्ल्यु असेच चित्र होते. उपस्थित जवळपास 90 टक्के प्रेक्षकांनी भारतीय संघाच्या रंगाची म्हणजे निळी जर्सी परिधान केली होती. भारताची फलंदाजी सुरु झाल्यावर तर पुणेकरांनी घोषणा व आरोळ्यांनी संपूर्ण मैदान डोक्‍यावर घेतले होते.

\n

विराटची गोलंदाजी अन् चाहत्यांचा जल्लोष…

\n

हार्दिकच्या नवव्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर बांगलादेशी फलंदाजाने दोन चौकार मारले होते. यानंतर अष्टपैलु हार्दिक पंड्याला गोलंदाजीदरम्यान दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. मात्र, त्याच्या षटकातील उर्वरीत 3 चेंडू गोलंदाजी करण्यासाठी विराट कोहलीने आपल्या हाती चेंडू घेतला. या वेळी स्टॅंडमध्ये असलेल्या हजारो चाहत्यांनी तुफान जल्लोष केला.

\n

#CWC2023 #INDvBAN : विराटची गोलंदाजी अन् चाहत्यांचा तुफान जल्लोष…ICC ने Video तर BCCI नं फोटो केलं शेअर….

\n

\n

कोहलीने या तीन चेंडूत केवळ 2 धावाच दिल्या. चौथ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव आली. मात्र, प्रत्येक चेंडू टाकण्यासाठी त्याने रनअप सुरु केली की प्रेक्षक प्रचंड जल्लोषात कोहली… कोहली… असा जयघोष करत होते. हे तीन चेंडू टाकून पूर्ण झाल्यावर कोहलीनेही देखील प्रेक्षकांना अभिवादन केले. विराट कोहली चष्मा लावून गोलंदाजी करताना दिसला. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. बीसीसीआयनेही फोटो शेअर केले आहेत.

\n

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

\n

#CWC2023 #INDvBAN : विराटच्या नाबाद शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार…

\n

\n

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 41.3 षटकांत तीन गडी गमावून 261 धावा केल्या आणि सामना जिंकला. विराट कोहलीने षटकार लगावत भारताचा विजय साकार केला. तसेच या षटकारासह त्याने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतकही पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरच्या  नावे सर्वाधिक 49 शतकं आहेत आणि या विक्रमापासून कोहली एक शतक मागे आहे.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC2023 #INDvBAN : पुणेकरांचा अभूतपूर्व जल्लोष; 27 वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेचा पुण्यात झाला सामना…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/veds.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvban-unprecedented-jubilation-by-punekars-after-27-years-the-world-cup-match-took-place-in-pune#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/veds.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvban-unprecedented-jubilation-by-punekars-after-27-years-the-world-cup-match-took-place-in-pune#webpage","name":"#CWC2023 #INDvBAN : पुणेकरांचा अभूतपूर्व जल्लोष; 27 वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेचा पुण्यात झाला सामना…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvban-unprecedented-jubilation-by-punekars-after-27-years-the-world-cup-match-took-place-in-pune","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvban-unprecedented-jubilation-by-punekars-after-27-years-the-world-cup-match-took-place-in-pune#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/veds.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvban-unprecedented-jubilation-by-punekars-after-27-years-the-world-cup-match-took-place-in-pune#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-indvban-unprecedented-jubilation-by-punekars-after-27-years-the-world-cup-match-took-place-in-pune","name":"#CWC2023 #INDvBAN : पुणेकरांचा अभूतपूर्व जल्लोष; 27 वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेचा पुण्यात झाला सामना…"}}]}}}

#CWC2023 #INDvBAN : पुणेकरांचा अभूतपूर्व जल्लोष; 27 वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेचा पुण्यात झाला सामना…