Curtis Campher : आयर्लंडच्या कॅम्फरचा मोठा धमाका! सलग पाच चेंडूंत ५ विकेट्स घेत रचला इतिहास, पाहा VIDEO

मैदानावर परत आल्याने आनंद -कर्टिस कॅम्फर
सामन्यानंतर कॅम्फर म्हणाला, षटकांच्या बदलामुळे काय चालले आहे ते मला समजले नाही. मी फक्त माझ्या गोलंदाजीवर विश्वास ठेवला आणि सर्वकाही सोपे ठेवले. जेव्हा त्याला विचारले गेले की तो ६ षटकांत ६ बळी घेऊ शकला असता का, तेव्हा तो विनोदाने म्हणाला, “नाही, असे होत नाही. जे झाले ते झाले. मैदानावर परत आल्याने मला आनंद होत आहे.”
Curtis Campher creates history! 🔥
He becomes the first player ever to take 5 wickets in 5 balls in a men’s professional game! 💥
He’s also the man who took four in four in the 2021 T20 World Cup against Netherlands. 🇮🇪👏#CurtisCampher #T20s #Ireland #Sportskeeda pic.twitter.com/dMUSQOdvHG
— Sportskeeda (@Sportskeeda) July 10, 2025
कॅम्फरला नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले. पुनरागमनानंतरच्या पहिल्या सामन्यात त्याने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या आणि या सामन्यात त्याने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. तो म्हणाला, जेव्हा तुम्ही जखमी होता तेव्हा तुम्हाला मानसिक त्रास होतो. पण आता संघात परत आल्याने बरे वाटते. मी स्वतःवर कामगिरी करण्यासाठी दबाव आणत होतो आणि या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्सवर लाल रंगाचा सागर; काय आहे ‘रेड फॉर रूथ’ मोहिम? जाणून घ्या
प्रत्येक चेंडूनुसार कर्टिस कॅम्फरचे पाच विकेट्स:
🔥 YOU JUST SAW SOMETHING NO ONE’S EVER DONE BEFORE!
5️⃣ balls. 5️⃣ wickets. 1️⃣ name etched in history – Curtis Campher is now the first bowler in the world to take 5 wickets in 5 deliveries in professional cricket!#CurtisCampher #WorldRecord pic.twitter.com/5AJ8gmnAVu
— FanCode (@FanCode) July 11, 2025
- १२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जारेड विल्सन क्लीन बोल्ड झाला.
- पुढच्याच चेंडूवर ग्रॅहम ह्यूमला एलबीडब्ल्यू केले.
- १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अँडी मॅकब्राइन झेलबाद केले.
- पुढच्याच चेंडूवर यष्टीरक्षकाने रॉबी मिलरचा झेल घेतला.
- १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोश विल्सन बोल्ड झाला.
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, परदेशात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडले –
कॅम्फरने एकूण २.३ षटकांत फक्त १६ धावा देत पाच विकेट्स घेतले. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे, परंतु महिला क्रिकेटमध्ये हा विक्रम आधीच झाला आहे. २०२४ मध्ये झिम्बाब्वेच्या केलिस एनधलोवूने झिम्बाब्वे अंडर-१९ संघाकडून खेळताना सलग पाच चेंडूत पाच विकेट्स घेतले होत्या.





