IND vs ENG : लॉर्ड्सवर लाल रंगाचा सागर; काय आहे ‘रेड फॉर रूथ’ मोहिम? जाणून घ्या

IND vs ENG What is Red for Ruth Foundation : लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व काही लाल रंगात रंगलेलं दिसलं. खेळाडूंपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळे लाल रंगाचे कपडे परिधान करून दिसले. यामुळे प्रेक्षकांच्या मनातही उत्सुकता निर्माण झाली की, नेमकं यामागचं कारण काय आहे? खरंतर, हे ‘रूथ स्ट्रॉस फाउंडेशन’च्या वार्षिक ‘रेड फॉर रूथ’ मोहिमेचं सातवं वर्ष आहे. या मोहिमेंतर्गत खेळाडू, कर्मचारी, प्रसारक आणि हजारो प्रेक्षक फाउंडेशनच्या उद्देशाला पाठिंबा देण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करतात.
‘रेड फॉर रूथ’ मोहीम काय आहे?
‘रेड फॉर रूथ’ ही मोहीम इंग्लंडचा माजी कर्णधार सर अँड्र्यू स्ट्रॉस यांच्या दिवंगत पत्नी रूथ स्ट्रॉस यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम आता क्रिकेट विश्वातील एक महत्त्वाचा भाग बनली आहे, जी लॉर्ड्सच्या मैदानाला लाल रंगाच्या ‘समुद्रात’ रूपांतरित करते. या मोहिमेचा उद्देश आहे की, ज्या कुटुंबांना पालकांच्या गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, त्यांच्याप्रती एकजुटीचं समर्थन दर्शवणं.
नक्की काय करतात?
It’s #RedForRuth Day at the @HomeOfCricket! 🔴
Please donate if you can to this amazing cause: https://t.co/kcvssvakyP#RedForRuth2025 | #EnglandCricket pic.twitter.com/FUpAvm0Bjy
— England Cricket (@englandcricket) July 11, 2025
दुसऱ्या दिवशी सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना लाल रंगाचे कपडे घालून लवकर येण्यास सांगितले होते, जेणेकरून ते पहिला चेंडू टाकण्यापूर्वी आयोजित विशेष उद्घाटन समारोहात सहभागी होऊ शकतील. मैदानावर स्वयंसेवक ‘रेड फॉर रूथ’ बकेट हॅट्स विकत होते आणि देणगीच्या बदल्यात रूथ रोझेस वाटप करत होते. गेल्या सहा वर्षांत प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे फाउंडेशनने 3,500 हून अधिक कुटुंबातील सदस्यांना दुखातून सावरण्यास मदत केली आहे आणि 1,000 हून अधिक कर्करोग देखभाल व्यावसायिकांना शोकाशी सामना करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, परदेशात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
इंग्लंडचा पहिला डाव 387धावांवर आटोपला-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ 4 बाद 251 धावांवर संपवला होता. त्यावेळी जो रूट 99 धावांवर आणि बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत होते. यानंतर दुसऱ्या दिवशी जो रूटने शतकी, तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांपर्यंत मजल मारता आला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर रेड्डी-सिराजने प्रत्येकी दोन आणि जडेजाने एक विकेट्स घेतली.





