CSK vs PBKS : चहल-अय्यरच्या जोरावर पंजाबने मारली बाजी! चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

CSK vs PBKS Punjab Kings beat Chennai Super Kings by 4 wickets : चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२५ मधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक या घरच्या मैदानावर सलग पाचवा पराभव पत्करावा लागला आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने पुन्हा एकदा यजमान चेन्नई सुपर किंग्जचा या मैदानावर ४ गडी राखून पराभव केला.
चेन्नईचा चेपॉकवर सलग पाचवा पराभव –
युझवेंद्र चहलच्या ऐतिहासिक हॅटट्रिक आणि श्रेयस -प्रभसिमरण यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने आपला सहावा विजय नोंदवला. या हंगामात आठव्या पराभवासह, चेन्नई स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून चेन्नईने १९१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पंजाबने १९.४ षटकांत सहा गडी गमावून १९६ धावा केल्या आणि सामना जिंकला. त्याचबरोबर सीएसकेचा संघ सलग पाचव्या पराभवासह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.
For his leading from the front act, #PBKS captain Shreyas Iyer bags the Player of the Match award 🏆
Scorecard ▶ https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS | @ShreyasIyer15 pic.twitter.com/hEkrHQlevA
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
सॅम करनची खेळी ठरली व्यर्थ –
Hat-trick 👌
Powerful start with the bat 🔥
Captain’s knock 🫡The Battle of Kings goes the @PunjabKingsIPL way again this season ❤
Scorecard ▶ https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/Yk1SOZOzip
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १९१ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. जर सॅम करनला इतर फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली असती तर ही धावसंख्या आणखी मोठी झाली असती. संघाने चौथ्या षटकात आणि २२ धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर, बढती मिळालेल्या अष्टपैलू सॅम करनने स्फोटक फलंदाजी केली. त्याला रवींद्र जडेजा आणि देवाल्ड ब्रेव्हिस यांची थोडीशी साथ मिळाली. करणने या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले पण शतकाच्या जवळ पोहोचत असताना तो १८ व्या षटकात बाद झाला.
हेही वाचा – IPL 2025 : ‘चंपक’मुळे बीसीसीआयच्या वाढल्या अडचणी, कोर्टाकडून मिळाली नोटीस; काय आहे प्रकरण?
युझवेंद्र चहलची ऐतिहासिक हॅट्ट्रिक –
करण बाद होताच, अय्यरने १९ व्या षटकात लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला परत बोलावले आणि चहलने या षटकात चेन्नईच्या २०० धावांच्या पुढे जाण्याच्या आशा संपुष्टात आणल्या. चहलने दुसऱ्याच चेंडूवर एमएस धोनीची विकेट घेतली आणि नंतर शेवटच्या ३ चेंडूंवर दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांचे विकेट घेत आयपीएल २०२५ ची पहिली हॅटट्रिक घेतली. ही त्याच्या कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक होती. अखेर संपूर्ण संघ २० व्या षटकात १९१ धावांवर ऑलआउट झाला.
हेही वाचा – CSK vs PBKS : युझवेंद्र चहलची ऐतिहासिक हॅट्ट्रिक: सीएसकेविरुद्ध रचला इतिहास, पाहा VIDEO
अय्यर-शशांकने चेन्नईच्या पुनरागमनाच्या धुळीस मिळवल्या –
चेन्नईसाठी पुनरागमनाच्या आशा होत्या पण कर्णधार अय्यरने शशांक सिंगसह या आशा धुळीस मिळवल्या. अय्यरने आणखी एक शानदार अर्धशतक झळकावले. शेवटच्या ३ षटकांत शशांक, अय्यर आणि सूर्यांश शेडगे बाद झाल्याने सामना रोमांचक होत चालला होता असे दिसत होते, पण १९ व्या षटकात चहलने केलेल्या कहराचा परिणाम येथे दिसून आला. जर चेन्नईकडे आणखी १० धावा असत्या तर ते हा सामना जिंकू शकले असते. अखेर पंजाबने १९.४ षटकांत सामना जिंकला.





