IPL 2024 (CSK vs LSG Match 39) : शतकी खेळीसह ‘रुतुराज गायकवाड’ने रचला इतिहास, खास विक्रम केला नावावर..!

IPL 2024 (Live Cricket Score, CSK vs LSG, Ruturaj Gaikwad Century ) : आयपीएल 2024 मध्ये खेळल्या जात असलेल्या 39व्या सामन्यात CSK कर्णधार रुतुराज गायकवाडने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. यासह गायकवाडने एक अप्रतिम विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 4 गडी गमावून 210 धावा केल्या. चेन्नईकडून फलंदाजी करताना CSK कर्णधार रुतुराज गायकवाडने अप्रतिम शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासातील गायकवाडचे हे दुसरे शतक आहे.
रुतुराजने शतकासह रचला इतिहास…
या सामन्यात रुतुराज गायकवाड एका वेगळ्याच लयीत दिसला. सुरुवातीपासूनच गायकवाडने लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या सामन्यात गायकवाडने गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. फलंदाजी करताना गायकवाडने 60 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान गायकवाडने 12 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. सीएसकेसाठी शतक झळकावणारा रुतुराज गायकवाड आयपीएल इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे. याआधी कोणत्याही CSK कर्णधाराला ही कामगिरी करता आली नव्हती. कर्णधार रुतुराजने 56 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने 18व्या षटकात यश ठाकूरला चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. या मोसमातील हे सहावे शतक ठरले.
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी भारताचे टॉप 3 फलंदाज कोण असावेत, इरफान पठाणने व्यक्त केले मत…
CSK ने 210 केल्या धावा…
या सामन्यात CSK संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 210 धावा केल्या. CSK कडून फलंदाजी करताना कर्णधार गायकवाडने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने अवघ्या 27 चेंडूत 66 धावा केल्या. शिवमने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 7 शानदार षटकार मारले. याशिवाय मिचेलने 11 आणि जडेजाने 16 धावा केल्या. या सामन्यात धोनीला फक्त एक चेंडू खेळायला मिळाला ज्यावर धोनीने शानदार चौकार लगावला.





