CSK vs KKR : रवींद्र जडेजाची गळाभेट घेणाऱ्या खेळाडूला धोनी म्हणाला गद्दार, VIDEO होतोय व्हायरल

CSK vs KKR MS Dhoni calls Dwayne Bravo traitor video viral : आयपीएल २०२५ मधील २५ व्या सामन्यात यजमान सीएसके आणि केकेआर आमनेसामने आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्त्वाखाली ९ बाद १०३ धावा केल्या. सीएसकेसाठी सर्वाधिक २९ धावा शुबम दुबेने केल्या, तर केकेआरकडून सुनील नरेनने ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीचा धोनीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोणाला तरी गद्दार म्हणताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघात मोठा बदल झाला आहे. संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. ऋतुराजच्या बाहेर पडल्यानंतर, उर्वरित सामन्यांसाठी संघाची कमान पुन्हा एकदा एमएस धोनीला सोपवण्यात आली आहे. माही पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळताना दिसत आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा धोनीची एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी केकेआरच्या एका सदस्याला गद्दार म्हणताना दिसत आहे.
एमएस धोनी व्हिडीओ होतोय व्हायरल –
View this post on Instagram
चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडल्यानंतर, उर्वरित आयपीएल हंगामात एमएस धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल. धोनीच्या नेतृत्वाखाली, या हंगामात, चेन्नई आपला पहिला सामना गतविजेत्या कोलकाताविरुद्ध खेळला. या सामन्यापूर्वी, एमएस धोनीचा ड्वेन ब्राव्होसोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – RCB vs DC : ‘आम्हाला फलंदाजीसाठी…’, आरसीबीच्या पराभवासाठी कार्तिकने कोणाला धरले जबाबदार?
‘गद्दार येथे आहे…’ – एमएस धोनी
तो व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘एमएस, डीजे, या व्हाइबची आठवण येते…’ असे म्हटले आहे. ज्यामध्ये एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक आणि सध्याचा केकेआर मार्गदर्शक ड्वेन ब्राव्होला गद्दार म्हणताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये धोनी म्हणतो, “हा गद्दार येथे आहे…” यावर उत्तर देताना ब्राव्हो म्हणतो, “जीवन खूप अन्याय्य आहे.” यानंतर, ब्राव्हो तिथे उपस्थित असलेल्या रवींद्र जडेजासोबत हस्तांदोलन करतो आणि नंतर नेटमध्ये उपस्थित असलेल्या एमएस धोनीला मिठी मारतो.
हेही वाचा – PSL 2025 सुरू होण्यापूर्वीच मोठी दुर्घटना, इस्लामाबादच्या टीम हॉटेलमध्ये लागली भीषण आग
विशेष म्हणजे २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद जिंकून देण्यात ब्राव्होने खेळाडू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ब्राव्होने एक वर्ष चेन्नई सुपर किंग्जमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले, मात्र, आयपीएल २०२५ पूर्वी, ब्राव्होने चेन्नई कोचिंग स्टाफ सोडला आणि केकेआरच्या मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली.





