PSL 2025 सुरू होण्यापूर्वीच मोठी दुर्घटना, इस्लामाबादच्या टीम हॉटेलमध्ये लागली भीषण आग

PSL 2025 A fire erupted on the top floor of Islamabad’s Serena Hotel : पाकिस्तान सुपर लीग २०२५ या स्पर्धेला सुरुवातीपूर्वीच एक मोठी दुर्घटना घडली. शुक्रवार ११ एप्रिल रोजी स्पर्धा सुरू होण्याच्या काही तास आधी इस्लामाबादमधील एका हॉटेलमध्ये आग लागली. या हॉटेलमध्ये अनेक खेळाडू, संघ अधिकारी आणि लीगशी संबंधित लोक थांबले होते. वृत्तानुसार, ही घटना शुक्रवारी हंगामाच्या पहिल्या सामन्यापूर्वी घडली.
या हंगामातील पहिला सामना इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळला जाणार होता. तथापि, ही घटना मोठ्या अपघातात रूपांतरित झाली नाही आणि खेळाडूंसह कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा हानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. इस्लामाबाद जिल्हा प्रशासनाच्या हवाल्याने पाकिस्तानी माध्यमांनी सांगितले की, इस्लामाबादच्या प्रसिद्ध सेरेना हॉटेलच्या वरच्या मजल्यावर आग लागली.
सेरेना हॉटेलच्या वरच्या मजल्यावर आग –
A fire broke out in the generator room of #Islamabad’s Serena Hotel, but was swiftly brought under control by fire brigade.
There were no casualties or damages reported, all PSL players & team managements safe. #PSL10 #PSL2025 pic.twitter.com/0K0Tauf09V
— Islamabad Updates (@IslamabadViews) April 11, 2025
पण ती हॉटेलच्या इतर मजल्यांवर पसरून मोठी घटना घडण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या पथकाने ती त्वरित आटोक्यात आणली. पीएसएलचे सीईओ सलमान नसीर म्हणाले की, खेळाडू आणि अधिकाऱ्यांना ताबडतोब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि कोणीही जखमी झाले नाही.
हेही वाचा – RCB vs DC : ‘आम्हाला फलंदाजीसाठी…’, आरसीबीच्या पराभवासाठी कार्तिकने कोणाला धरले जबाबदार?
अर्ध्या तासात आटोक्यात आणली आग –
अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरच्या मजल्यावर लागलेली आग आत पसरू शकली नाही आणि अग्निशमन दलाच्या सहा पथकांनी लवकरच आग आटोक्यात आणली. या कालावधीत, ५० अग्निशामक या संपूर्ण ऑपरेशनमध्ये गुंतले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेचे यश म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात आग विझवण्यात आली. यामुळे, पीएसएलच्या सुरुवातीला कोणताही व्यत्यय आला नाही आणि स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाव्यतिरिक्त, सामने देखील वेळेवर सुरू होऊ शकले.


