CSK vs DC : टीम बदलताच केएल राहुलचं बदललं नशीब! विराट-गेलला मागे टाकत रचला इतिहास

CSK vs DC KL Rahul surpassing Virat Kohli and Chris Gayle : आयपीएल २०२५ चा १७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलच्या ७७ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत १८६ धावा केल्या. केएल राहुलने या खेळीच्या एक खास पराक्रम केला आहे.
केएल राहुलने रचला इतिहास –
आयपीएल कारकिर्दीत सलामीवीर फलंदाज म्हणून १०० वा सामना खेळणाऱ्या राहुलने या सामन्यात संयमी फलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकापर्यंत दिल्लीसाठी धावा काढल्या. राहुल आयपीएलमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून १०० वा सामना खेळणारा १३ वा खेळाडू ठरला. या सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली. खरं तर, तो सलामीवीर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीसह किमान १००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
केएल राहुलने आतापर्यंत ४८.९६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने विराटला मागे टाकले आहे, ज्याने सलामीवीर म्हणून ४५.८६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर केएल राहुलने कोहली-गेलचा विक्रम मोडला.
आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून किमान १००० धावा करणाऱ्या खेळाडूंची सर्वाधिक सरासरी :
केएल राहुल – ४८.९६*
विराट कोहली – ४५.८६
ऋतुराज गायकवाड – ४४.०१
ख्रिस गेल – ४१.८६
जोस बटलर – ४१.७०
लेंडल सिमन्स – ३९.९६
डेव्हिड वॉर्नर ३९.९३
शुबमन गिल – ३८.९४
हेही वाचा – CSK vs DC : MS Dhoni आज निवृती घेणार? आई-वडील पहिल्यादांच स्टेडियमध्ये सामना पाहायला आल्याने चर्चेला उधाण
केएल राहुलने साकारली ७७ धावांची खेळी –
या सामन्यात राहुलने ५१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, राहुलने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. या काळात त्याने १५०.९८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर, दिल्लीने चेन्नईच्या मैदानावर २० षटकांत १८३/६ धावा केल्या. त्याच्याशिवाय अभिषेक पोरेलने २० चेंडूत ३३ धावांची खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने १२ चेंडूत २४ धावा केल्या.





