CSK vs DC : दिल्लीने सलग तिसऱ्या सामन्यात राखलं तख्त! धोनीच्या चेन्नई एक्सप्रेसने साधली पराभवाची हॅट्ट्रिक

CSK vs DC Delhi Capitals beat Chennai Super Kings by 25 runs : फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला २५ धावांनी पराभूत केले. दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे आणि आयपीएल २०२५ मध्ये त्यांची अपराजित मोहीम सुरूच आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत सहा गडी गमावून १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेला २० षटकांत पाच गडी गमावून फक्त १५८ धावा करता आल्या.
दिल्लीचा सलग तिसरा विजय, तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव –
आयपीएल २०२५ मधील आतापर्यंतच्या चार सामन्यातील सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर एकमात्र विजय मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवत आला होता. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामातील विजयी घोडदौड कायम राखताना विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे, या संघाला आतापर्यंत एकही पराभव पत्करावा लागला नाही.
Hat-Trick of Wins ✅
Memorable win at Chepauk after 1⃣5⃣ years ✅@DelhiCapitals cap off a commanding 2⃣5⃣-run victory over #CSK 🥳Scorecard ▶ https://t.co/5jtlxucq9j #TATAIPL | #CSKvDC pic.twitter.com/D9oWDI4hN2
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
धोनी-शंकरची ८४ धावांची भागीदारी ठरली व्यर्थ –
लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी फक्त ७४ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या. यानंतर विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली, परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. विजय शंकरने शानदार फलंदाजी करत ५४ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या, तर धोनीने २६ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह ३० धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.
हेही वाचा – CSK vs DC : टीम बदलताच केएल राहुलचं बदललं नशीब! विराट-गेलला मागे टाकत रचला इतिहास
या सामन्यात चेन्नईच्या टॉप ऑर्डरला पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. सीएसकेकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने १८ धावा, डेव्हॉन कॉनवेने १३ धावा, कर्णधार ऋतुराज गायकवाडने पाच आणि रचिन रवींद्रने तीन धावा केल्या दिल्लीकडून विपराज निगमने दोन, तर मिचेल स्टार्क, मुकेश कुमार आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हेही वाचा – LSG vs MI : लखनौच्या ऋषभ आणि दिग्वेशला BCCI चा दणका! ‘या’ कृतीसाठी केली दंडात्मक कारवाई, जाणून घ्या कारण
केएल राहुलने साकारली ७७ धावांची खेळी –
तत्पूर्वी या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ६ गडी गमावून १८३ धावा केल्या होत्या. या संघाला शेवटच्या ५ षटकांत फक्त ४५ धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ५१ चेंडूत सर्वाधिक ७७ धावांची खेळी साकारली. त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि ३ षटकार लागले. अभिषेक पोरेलने ३३, अक्षर पटेलने २१ आणि ट्रेस्टन स्टब्सने नाबाद २४ धावा केल्या. चेन्नईकडून खलील अहमदने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.





