Pune: दहशत करण्यासाठी पिस्तुल बाळगणारा तडीपार गुंड जेरबंद

पुणे – दहशत माजवत भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून पिस्तूलासह एक जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी(30 डिसेंबर) करण्यात आली.
गंभीर गुन्हयांना प्रतिबंध करण्याकामी वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक विजय खोमणे (गुन्हे) यांचे आदेशाने दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस उप निरीक्षक स्वप्नील लोहार व तपास पथक गस्त घालत होते.
दरम्यान पोलीस अमंलदार अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले व कुंदन शिंदे यांना खबर मिळाली की, “एक व्यक्ती त्याचेजवळ देशी बनावटीचे पिस्टल बाळगूण तावरे बेकरीजवळ, (अरण्येश्वर) रस्त्याचे कडेला एकटाच कोणाची तरी वाट बघत थांबला आहे.
खबरेच्या अनुषंगाने उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व पथक घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाणेकडील तडीपार गुन्हेगार रोहीत विजय अवचरे (रा. शाहु वसाहत, गजानन महाराज मठासमोर, लक्ष्मीनगर, पर्वती) यास ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे डावे कमरेला खोसलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. अवचरेला पुणे शहरातुन एक वर्षासाठी 7 डिसेंबर पासून तडीपार करण्यात आले आहे.
आरोपीवर दत्तवाडी पोलीस ठाणे येथे यापुर्वी दंगा, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व मारामारी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हयात त्यास अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कुंदन शिंदे हे करीत आहेत
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम संजय शिंदे , पोलीस उप-आयुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पोमाजी राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, पोलीस अमंलदार अक्षयकुमार वावळे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर प्रमोद भोसले, शरद राऊत, विष्णु सुतार यांनी केली आहे.





