Crime News : धक्कादायक ! योजनेच्या पैशांसाठी नातवानेच केला आजीचा घात
कर्नाटकातील बेळगव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात अर्लिकट्टी गावात एका ७८ वर्षीय महिलेची तिच्याच नातवाने हत्या (Crime News) केली.

Crime News : कर्नाटकातील बेळगव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात अर्लिकट्टी गावात एका ७८ वर्षीय महिलेची तिच्याच नातवाने हत्या (Crime News) केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कर्नाटक सरकारच्या गृह लक्ष्मी योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांसाठी ही हत्या करण्यात आली. मृत महिलेचे नाव हम्माव्वा सनादी होते.
आरोपी नातू, भीमप्पा सनादी याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी (Crime News) सुनावली आहे. आरोपी भीमप्पा आपल्या आजीवर गृह लक्ष्मी योजनेचे पैसे देण्यासाठी दररोज दबाव टाकत असे. तो यावरून अनेकदा तिचा छळही करत असे. १० नोव्हेंबर रोजी ती वृद्ध महिला अचानक घरातून गायब झाली.
१५ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह हिडकल धरणाच्या खाडीत सापडला. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह एका दगडाला बांधून, पोत्यात कोंबून पाण्यात फेकून देण्यात आला होता. आरोपीने १० नोव्हेंबर रोजी चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आपल्या आजीला मोटरसायकलवरून नेले. त्याने कुंदरगी सोसायटीमधून त्याने पैसे काढले. त्यानंतर तो तिला गवी सिद्धेश्वर टेकडीवर घेऊन गेला.
जिथे त्याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर, आरोपीने २,३०० रुपये रोख आणि तिची सोन्याची साखळी घेतली. त्यानंतर त्याने मृतदेह एका पोत्यात कोंबला, त्यात दगड ठेवले आणि मोटरसायकलवरून सुमारे १५ किलोमीटर दूर नेऊन हिडकल धरणाच्या खाडीत (Crime News) फेकून दिला. आपली निर्दोषत्त्व सिद्ध करण्यासाठी, आरोपीने आपली आजी बेपत्ता झाल्याचे आणि आपण तिचा शोध घेत असल्याचे नाटक केले.






